कणकवली समर्थनगर येथे बिअरबार, परमिट रूमला परवानगी नको

समर्थनगर मधील रहिवाशांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

कणकवली समर्थनगर नरडवे रोड येथे समर्थनगर ही नागरी लोकवस्ती असुन तेथे चार पाच इमारती व अनेक बंगले असून या वस्तीत शांततापूर्ण वातावरण असुन सर्व सुशिक्षित लोकांची वस्ती आहे. तसेच जवळ पोद्दार स्कूल आहे व मुलांचा येण्याजाण्याचा मार्ग व बसस्टॉप आहे. या वस्तीत आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
आता सदर समर्थनगर कणकवली येथे नरडवे रोडवर नियोजित बिअरबार परमिट रुमचा स्थानिक रहिवाशी यांच्या शी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता परवाना देण्यात येत आहे असे समजते. तरी सदर ठिकाणी परमिट रुम बिअरबार चालू करणेस सर्व रहीवासींची हरकत आहे. जर तेथे परमिट रुमची परवानगी दिली तर आमच्या वस्तीत व आजूबाजूच्या परिसरात अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. तरी सदर ठिकाणी आम्हां लोकांच्या भावनांचा विचार करुन व संभाव्य धोक्याचा विचार करुन परमिट रुमला परवानगी देऊ नये. जर त्याठिकाणी या नागरीवस्तीत कोणत्याही प्रकारच्या मदयपानास, बिअरबार परमिटरुमला परवानगी दिल्यास आम्ही नागरिक तीव्र आंदोलन करु याची दखल घ्यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, विशाल डांमरी, अशोक डामरी, सिद्धेश गोसावी, रामचंद्र सावंत आदींनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे .

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!