फायनान्स कंपन्यांनी ग्राहकांना शिव्या दिल्यास गाठ मनसे सोबत

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा इशारा

पोलिसांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३-१४ वर्षे वाहनांना विविध कंपन्या फायनान्स करतात.त्या कंपन्या जलद गतीने कर्ज पुरवठा करत ग्राहकांना गाड्या देतात.त्यामागे हे जिल्ह्यात गाड्यांचे डीलर आहेत ते फायनान्स कंपण्यांची नावे सुचवतात.आमच्याकडे अनेक तक्रारी येत आहेत,वसुली एजन्सी कडून ग्राहकांना अश्लील शिव्या देत सावकारी पद्धतीने वसुली केली जात आहेत.यापुढे जिल्ह्यातील फायनान्स कंपण्यांकडून ग्राहकांना शिव्या दिलास गाठ मनसेशी असेल,असा इशारा माजी आ.परशुराम उपरकर यांनी दिला आहे.तसेच वाहन कर्ज घेताना ग्राहकांनी बँकांचा पर्याय स्वीकारावा असे आवाहन त्यांनी केले.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
ग्राहकांना वाहनासाठी कर्ज देत असताना त्या कंपन्या ३ महिन्यांचे चेक घेतात,दोन चेक वाटल्यानंतर आयडी ओपन करतात. फायनान्स कंपनिकडून देवगड येथील ग्राहकाची तक्रार आल्यानंतर त्या कंपनीच्या कार्यालयात गेल्यानंतर ज्या काही गोष्टी उघडकीस आल्या त्या ग्राहकांना धक्कादायक आहेत,त्यात कर्ज स्टेटमेंट पैसे घेतल्याशिवाय देत नाही.चेक बाऊन्स झाल्या तर दंड आकारणी केली जाते.एक चेक बाऊन्स झाला तरी वसुली साठी पथक सांगली येथून येतात.स्थानिकांना अश्लील शिव्या दिल्या जातात.ग्राहकांकडून आपल्या खात्यावर हप्त्यांचे पैसे भरायला सांगतात. त्यानंतर ८ हजार रुपये दिल्या शिवाय हप्ते भरले जात नाहीत,अशी धमकी दिली जाते असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवलीत त्या फायनान्स कंपनीचा व्यवस्थापक आहे.त्याने आपल्या नातेवाईकांची जमिन भाडे तत्वावर त्या गाड्या ओढून ठेवली जाते. एजन्सी मार्फत गाड्या ओढल्या जातात.त्यानंतर त्या गाड्या रस्त्यावर फिरत असतात,त्या भाड्यासाठी वापरल्या जातात.हप्ते भरले तरी दंड घेवून देखील गाड्या ओढून नेतात.श्री.बांदेकर यांना आई वरुन शिवीगाळ दमदाटी केली.१९ हजार हप्ता भरूनही येण्याजण्याचा खर्च ८ हजार रुपयांचे मागणी केली.इथल्या व्यवस्थापक यांना विचारले तर ग्राहकांनी कोणालाही पैसे देवू नका असे सांगतात,असे श्री.उपरकर यांनी सांगितले.

ग्राहकांकडून पैसे घेतल्याची माहिती ऑफिसला नसते. शासनाच्या नियमानुसार थकित कर्जदारांना शिवीगाळ करणे,विना नोटीस गाडी जप्त करणे असे प्रकार श्रीराम ,चोलो फायनान्स कंपन्या केले जात आहेत. ग्राहकांकडून सावकारी व्याजपेक्षा पैसे घेत लूट केली जात आहे.लोकांनी बँकांकडून कर्ज घ्यावे.अश्या तक्रार असल्यास त्यांनी मनसे कार्यालयात कराव्यात.सर्व तक्रारींचे संकलन करत वरिष्ठ पातळीवर मंत्री,केंद्रीय पातळीवर तक्रार करणार आहोत,असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!