मृत मुलाच्या कुटुंबाला आर्थिक मदत न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल – संत रविदास समाज संघटनांचा इशारा

दिनांक – ३१ / ०८ / २३ रोजी उदय रमेश शिरलकर या शाळकरी मुलाचा कुर्ली देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यात फोंडा – साईनगर येथे अपघाती मृत्यू झाला . सदर मुलाच्या कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. मृत उदय हा रमेश शिरवलकर यांचा एकुलचा एक मुलगा.
वडीलांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने चुलत्याची सकाळी व संध्याकाळी गुरे चारून तो इ . १० वीचे शिक्षण घेत होता.
चुलतेच त्याच्या शिक्षणासाठी थोडाफार हातभार लावत.
असाच शाळेतून आल्यावर गुरे घेऊन सायंकाळी माळावर गेला असता , म्हैशींना कालव्यात जाऊ नयेत म्हणून फिरविण्यासाठी जात असताना उदयचा पाय घसरला व तो तोल जाऊन खोल कालव्याच्या खड्डयात पडला . चिखलात रुतल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला .
त्याचा मृत्यू होऊन आज दोन महिने उलटले तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी किंवा शासनाने याची जरा ही दखल घेतली नाही .
चर्मकार समाज संघटनांच्या वतीने मा . जिल्हाधिकारी , मा .जिल्हा पोलिस अधिक्षक , ‘ मा . तहसिलदार कणकवली ‘ मा . विभागीय पोलिस अधिकारी तसेच मा .पोलिस निरीक्षक कणकवली यांचेकडे निवेदने देण्यात आली आहेत .
तसेच मा. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग , आंबडपाल – कुडाळ यांचेकडे ही मदत देण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई जिल्हा शाखा – सिंधुदुर्ग अध्यक्ष – मा. चंद्रकांत चव्हाण , जिल्हा सरचिटणीस श्री . संतोष जाधव . व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोबत – चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा – कणकवलीचे अध्यक्ष – महानंद चव्हाण , उपाध्यक्ष – सत्यविजय जाधव . सचिव – मंगेश साळसकर यांचेसह निलेश शिरवलकर , सुर्यकांत शिरवलकर , विजय फोंडेकर ,अनिकेत फोंडेकर , अंकित फोंडेकर , दिपक फोंडेकर , रूपेश फोंडेकर ,’ भिकाजी फोंडेकर इत्यादी समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शासन आज आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांना तात्काळ सहानुभूती पूर्वक मदत जाहिर करते.
अतिवृष्टी ,नैसर्गिक आपत्ती , रस्ते अपघात इ . प्रसंगी शासन मृत व्यक्ती च्या कुटुंबियांस मदत देते. पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रमेश शिरवलकर यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून त्यांना तातडीची मदत होणे अत्यंत गरजेचे आहे.
शासनाने व संबंधित विभागाने याची दखल घेतली नाहीं व कालव्याचे काम सुरू केले तर सिंधुदुर्गातील तमाम चर्मकार समाज बांधवांच्या वतीने सदर कुटुंबास न्याय मिळेपर्यंत तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संबंधीत समाज संघटना प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

error: Content is protected !!