कणकवली सिद्धार्थनगर येथील अंगणवाडी जिल्ह्यात आदर्शवत ठरेल

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते अंगववाडीचे लोकार्पण

कणकवली : कणकवली सिद्धार्थ नगर येथे कणकवली नगरपंचायत च्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे व
उपनगराध्यक्ष गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्या प्रसंगी वाडीतील रहिवाशी श्री.सुनील हिंदळेकर व श्री.सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष श्री.समीर नलावडे यांचे स्वागत केले.
सौ.प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष श्री.बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सौ.सुर्वे यांचे स्वागत देखील करण्यात आले. यावेळी अंगणवाडी चे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग व
माजी नगरसेवक श्री.गौतम खुडकर, श्री.आनंद जाधव, श्री.विश्वास कांबळे, श्री.महेंद्र जाधव, श्री.संदीप कांबळे, श्री.सतीश कांबळे, माजी नगरसेविका सौ.विशाखा कांबळे, नगरसेविका सौ उर्वी जाधव व अंगणवाडी साठी ज्यांनी जमीन दिली ते जमीन मालक श्री.सिकंदर जाधव व त्यांच्या मातोश्री या देखील उपस्थित होते. ही अंगणवाडी जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असा विश्वास श्री नलावडे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!