कनेडी वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आठवणींना दिला उजाळा
मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय तर्फे ” वाचन प्रेरणा दिन ” साजरा करण्यात आला यावेळी वक्त्यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या साधी राहणी उच्च विचारसरणी व देश भक्ती या विषयी च्या आठवणींना उजाळा दिला. तसेच वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे ठरविण्यात आले कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालयचे अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सांगवे सरपंच संजय उर्फ बाबू सावंत, पत्रकार विनय सावंत, चंद्रकांत दड्डेकर मुंबई,उपाध्यक्ष मोहन सावंत सचिव नंदकुमार काणेकर सदस्य बावतीस घोन्सलवीस शेखर तावडे शशिकांत कुबडे ग्रा प सदस्य राजेश सापळे माजी चेअरमन धोंडी वाळके विजय कुडतरकार तसेच पंचक्रोशीतील वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





