पिंगुळीत १६ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : युवा प्रतिष्ठान ग्रुप पिंगुळी पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत सिध्दिविनायक मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सव निमित्त सोमवार १६ ऑक्टोबरला, रात्रौ ८:०० वा. जिल्हास्तरीय रेकॉड डान्स स्पर्धा म्हापसेकर तिठा, पिंगुळी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमाक 3 हजार 23, द्वितीय क्रमांक 2 हजार 23, तृतीय क्रमांक 1 हजार 23, प्रत्येकी भव्य चषक, तसेच स्पर्धेमध्ये सहभाग स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी विशाल कुंभार, प्रथमेश शिरोडकर- ९४०५७१६३६३ याच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.