वनविभागाची धडक कारवाई

सावंतवाडी बांदा -मडूरे रस्त्या पासून काही अंतरावर विनापरवाना जळाऊ लाकूड मालाची वाहतूक करीत असलेला टेम्पो क्रमांक MH -07 2261 पकडून वाहन चालक संदीप दळवी रा.आंबेगाव यांचेवर विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल करून विनापरवाना वाहतुक करणारा टेम्पो लाकूडमाला सहित जप्त करणेत आला. सदरचे वाहन व लाकूड माल श्री.विठ्ठल सहदेव गावडे रा कुणकेरी यांचे असलेबाबत चौकशीत समोर आले आहे.
सदरची कारवाई वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शना खाली वनपाल आजगाव श्री.पृथ्वीराज प्रताप,वनरक्षक आपासाहेब राठोड,संग्राम पाटील,सागर भोजने यांनी केली.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!