जनसेवा प्रतिष्ठानच्या सातत्याचा यश…

ऐतिहासिक वास्तू डच वखार दुरुस्ती व यशवंत गड उर्वरित बांधकामासाठी निधी मंजूर….
शिवरायांच्या स्वराज्यासाठी योगदान असलेली व डच यांनी सोळाव्या शतकात आदिलशहाच्या संमतीने वेंगुर्ले येथे बांधलेली किल्लेवजा वास्तु डच वखार याला प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून अनन्यसाधारण साधारण महत्व आहे .
डच वखार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वृध्दीसाठी एक महत्त्वाची वास्तु असल्याने आपणं गेली दहा वर्षे सातत्याने पुरातत्व विभागाच्या परवानगीने या ऐतिहासिक वास्तूत स्वच्छता मोहिमा राबवुन शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे डच वखार डागडुजी व दूरुस्ती साठी पत्र व्यवहार केलेला होता या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच डच वखार या वास्तूची दुरुस्ती सुरू होणार असल्याचे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष
डॉ. संजीव लिंगवत यांनी सांगितले.
पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन निधी तुन तीन टक्के रक्कम प्राचीन वास्तू संरक्षक व संवर्धन साठी खर्च करण्यात यावेत या शासनाच्या आदेशानुसार पुरातत्व विभाग रत्नागिरी यांनी शासनाकडे डच वखार वास्तु दूरुस्ती साठी तीन कोटींचा प्रस्ताव पाठविला असल्याचे डॉ. संजीव लिंगवत यांनी सांगितले व सदर डागडुजी लवकरात लवकर सुरू करावी असे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे कार्यालय रत्नागिरी येथे पुरातत्व विभागानचे कनिष्ठ अभियंता शांताराम खेकडे यांना सुपुर्त केले.
यावेळी पुरातत्व खाता रत्नागिरी येथील तंत्रज्ञा रुची शेंडगे, कार्तिक दरेकर, करण बेतकर, प्रांजल कोकीतकर, वैभव शिंदे,भक्ती गोसावी , माही तुळसकर व जनसेवा प्रतिष्ठान कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर पुरातन वास्तू डागडुजी संदर्भात जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती सुरू न केल्यास आपण या ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे शासनाला ठणकावून सांगितले होते असंही डॉ. लिंगवत यांनी सांगितले असुन शासनाच्या या निर्णया बाबतीत समाधान व्यक्त केलें व संचालक डॉ. विलास वहाने यांचे आभार व्यक्त केले.
डच वखार डागडुजी व दुरुस्ती सोबत किल्ले यशवंतगड, रेडी यांचे उर्वरित बांधकाम पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.





