आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी

सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच, गणेश मठकर, यांच्या पाठपुराव्याला यश
गेली अनेक वर्षे कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेले, वैद्यकिय अधिकारी पदी डॉ. श्रीमती स्नेहल परब, यांची नियुक्ती करणेत आलेली असून, वैद्यकिय अधिकारी स्नेहल परब, यांचे कळसुली गावाचे वतीने सरपंच, श्री. सचिन पारधिये, यांच्या उपस्थितीत स्वागत करणेत आले. कळसुली पंचक्रोशीतील आठ गावांच्या आरोग्य सुविधेचा भार असलेल्या, कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये अनेक वर्षे कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी, नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. तरी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली, येथे कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी मिळणेबाबत सरपंच, श्री सचिन पारधिये, व उपसरपंच, श्री गणेश मठकर, यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केलेला होता. तरी याबाबत मा. आमदार नितेश राणे, यांनी याविषयी जातीनिशी लक्ष घालून, आरोग्य विभागा कडे केलेले शिफारशीनुसार श्रीमती. स्नेहल परब, यांची कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी म्हणून, आरोगय विभागामार्फत नियुक्ती केलेली आहे. तरी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी, यांचे सदर नियुक्तीबात आमदार, नितेश राणे, यांचे कळसुली गावाचे वतीने, आभार व्यक्त करणेत आले. यावेळी सरपंच, श्री. सचिन पारधिये, उपसरपंच, श्री गणेश मठकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष, श्री दिलिप सावंत, श्री अरुण दळवी, श्री आत्माराम नार्वेकर, श्री संदिप दळवी, श्री रामचंद्र गुरव, श्री ज्ञानदेव गांवकर, श्री रामचंद्र सावंत, श्री भरत गांवकर, श्री महेश देसाई, श्री राजाराम परब, श्री भाई गावकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी





