आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून नाबार्ड अंतर्गत 3 कोटी ५० लाखाच्या कामाला

कणकवली मतदारसंघात विकास निधी चा ओघ सुरूच
या दोन्ही ठिकाणच्या जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे समाधान
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील व ग्रामीण मार्गांवरील पूल बांधणेच्या नाबार्ड २९ कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे. सदर मंजूर कामांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या शिफारस पत्रानुसार मतदारसंघातील १) बिडवाडी पिसेकामते रस्ता इ. जि.मा. २९ ता. कणकवली येथे कॉजवेच्या ठिकाणी पूल बांधणे. रू. १ कोटी ७० लाख व २) जांभवडे बौद्धवाडी रस्ता ग्रा. मा. १७ ता. वैभववाडी येथे पूल बांधणे. रू.१ कोटी ८० लाख अशा एकूण ३ कोटी ५० लाख रूपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
या कामांमुळे तेथील ग्रामस्थांची बारमाही वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. म्हणून ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर् रविंद्र चव्हाण व कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील धडाडीचे आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.
कणकवली प्रतिनिधी





