‘अग्निवीर’ आकाश एकनाथ म्हापणकर यांचा पाट विद्यालयामध्ये सत्कार

अग्निवीर योजनेतून भारतीय सैन्यदलात निवड
निलेश जोशी । कुडाळ : भारत सरकारच्या अग्निवीर योजनेतून सैन्यदलात निवड झाल्याबद्दल पाट विद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश एकनाथ म्हापणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी. ए. सामंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन आकाश म्हापणकर यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. कोरे यांनी केले. अग्निवीर आकाश म्हापणकर हे म्हापण गावचे सुपुत्र व पाट विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. यावेळी अग्निवीर आकाश म्हापणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेहनत, चिकाटी, जिद्द ,देशासाठी समर्पणाची भावना, त्याग या गोष्टीमुळे माझी सैन्यदलात निवड झाली. विद्यार्थ्यांनी देखील असे उच्चतम ध्येय बाळगून देशाच्या संरक्षणाचे व्रत अंगीकारावे असे विचार त्यांनी व्यक्त केले.
संस्थेचे उपाध्यक्ष डी. ए. सामंत यांनी अग्निवीर आकाश म्हापणकर यांना शुभेच्छा दिल्या, तसेच विद्यार्थ्यांनी या आदर्शाचे अनुकरण करावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे खजिनदार देवदत्त साळगांवकर, संस्था पदाधिकारी .नारायण तळावडेकर पर्यवेक्षक श्री हंजनकर सर ,विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. सामंत यांनी केले, तर आभार श्री् हंजनकर सर यांनी मानले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.