दिनांक ०८/१०/२०२३ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवात भजनी बुवांचा सत्कार करण्यात आला

आम्ही कणकवलीकर आणि व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने रिक्षा मालक चालक संघटना,कणकवली, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या २० व्या रात्री प्रथम भजन सादर करणार्या भजन मंडळाच्या बुवांचा राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत, अशोक करंबेळकर (जेष्ठ पत्रकार) आणि दादा कुडतरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले
या प्रसंगी अशोक काका करंबेळकर, दादा कुडतरकर आणि राजेंद्र पेडणेकर यांनी भजन, किर्तन आणि नर्तन या विषयावर आपली मते मांडली.
यावेळी उपस्थित संजय मालंडकर, सुभाष उबाळे आणि रिक्षा मालक चालक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.
रिक्षा मालक चालक संघटनेच्या वतीने आम्ही कणकवलीकर आणि व्यापारी मित्र मंडळाच्या उपस्थितां चे श्रीफळ देऊन आभार मानले, आणि सर्वांनी यापुढील काळात असेच सहकार्य करावे असे म्हटले.