आमदार नितेश राणेंची संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका

निवडणुका ठाकरे गटामुळेच लांबल्याचा आरोप
रश्मी ठाकरेंना सामना चे संपादक बनवून, संजय राजाराम राऊत ची लायकी काढली.
ग्रामसेवक बनायची लायकी नसलेला संजय राजाराम राऊत 2019 ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते.शरद पवार आपलेच नाव चालवणार म्हणून आमदारांना फोन करायला लागला पण त्यांच्या लायकी प्रमाणे 2 ते 3 पेक्षा जास्त आमदार याच्या बैठकीला जमलेच नाहीत. ही संजय राऊत ची लायकी आहे अशा शेलक्या शब्दात आमदार नितेश राणेंनी टीका केली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमची लायकी ओळखली म्हणूनच संजय राजाराम राऊत चा भाऊ सुनील राऊत ला साधं राज्यमंत्री केलं नाही.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलण्याआधी संजय राजाराम राऊत यांनी स्वतःची लायकी पाहावी अशी खोचक टीका भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केली.
दरम्यान शिवसेना आमदार ला उद्देशून तुम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबाना किती त्रास देता हे पहा. फडणवीस यांनी काय काम करावे कुठे करावे हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाही.
या तिघांना काम करू द्या.तुमच्या बोलण्याचा राऊत,ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नका. असे आवाहन मित्र पक्षाच्या आमदारांना केले.
मुंबई महा नगरपालिका निवडणुकीत ऊबाठा सेनेमुळे लांबत आहे.ऊबाठा सेनेने न्यायलायत टाकलेल्या याचिका मागे घ्या मग निवडणूक आयोग निवडणुका घेईल.मनोज जरंगे पाटील यानी समाजाचे काम करावे.
उबाठा चे स्वतःचे चिन्ह नाही पक्ष नाही. मग काय करणार त्यांना इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही. बाळासाहेब तुमचे सुद्धा विठ्ठल होते ना मग त्यांचे घर का फोडले. पवार तुमचे होते मग त्याचे घरात फूट का पडली. आग लावून शकुनी मामा सारखी भूमिका करतात अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. संजय राऊत यांची स्क्रिप्ट कुठून येते ?मातोश्री,सिलवर ओक की पवार साहेबांकडून येते हे आधी सांग. नंतर दुसऱ्यावर टीका कर असेही सुनावले.
कणकवली प्रतिनिधी





