राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते कणकवलीतील रिक्षा चालक, मालक संघटनेच्या गणपतीची आरती

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी अजित दादा पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली ऑटो रिक्षा चालक मालक संघटना सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीड़ा मंडळ कणकवली नवसाला पावणारा कणकवलीचा राजा अशी ओळख असणाऱ्या 21 दिवसाच्या गणपतीची आरती केली. रिक्षा संघटनेचे पदाधिकारी गेली अनेक वर्ष अबिद नाईक यांना आरती करण्यासाठी आपुलकीने निमंत्रित करत असतात. आणि त्याच प्रेमाने अबिद नाईक त्यांच्या सर्व कार्यक्रमांमधे सहभागी होत असतात. आरती करतेवेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराड़कर, सेक्रेटरी भाई परब, रिक्षा संघटनेचे संचालक संतोष सावंत, बाळू वालावलकर, मनोज वारे, मोर्ये, राष्ट्रवादी कणकवली शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी शहर चिटणीस गणेश चौगुले, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस सचिन अडुलकर,व रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!