माड्याचीवाडी विद्यालयाला डॉ शुभा मुद्गल यांची भेट

माध्यमिक विद्यालय माद्याचीवाडी या विद्यालयाला नुकतीच मुबई मध्ये कॅन्सर पिडीत लोकांसाठी सेवा देणाऱ्या डॉ. शुभा मुद्गल यांनी आपल्या परिवारासह भेट दिली विद्यालयात IBT अंतर्गत चालू असलेलेया विविध उपक्रमाची माहिती घेतली. IBT उपक्रमांतर्गत शेती व पशुपालन, अभियांत्रिकी,गृह व आरोग्य व उर्जा अशा सर्व विभागांची माहिती जाणून घेतली तसेच IBT प्रमुख श्री सामंत सर यांनी प्रशालेत चालू असलेल्या मधुमक्षिका पालन या उपक्रमाबद्दल माहिती दिली या सर्व उपक्रमांचे डॉ. शुभा मुद्गल यांनी कौतुक केले व पुन्हा सविस्तर माहिती घेण्यासाठी येण्याची ग्वाही दिली. सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री बाळकृष्ण रावण यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत मा. सीमा सरनाईक ,मा. सुचेता खानोलकर, श्री, रविंद्र सरनाईक व सौ. रश्मी सरनाईक उपस्थित होते