शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी

राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा
सिंधुदुर्गनगरी, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली.
या परीक्षेसाठी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने भरायचे आहे. परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. शाळा माहितीपत्र, नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर असा आहे. शाळा माहितीपत्र, विलंब शुल्कासह आवेदन पत्र भरण्याचा कालावधी १ ते १५ डिसेंबर असा आहे. शाळा माहितीपत्र, अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा कालावधी १६ ते २३ डिसेंबर असा आहे. शाळा माहितीपत्र, अतिविशेष विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा कालावधी २४ ते ३१ डिसेंबर आहे. परीक्षेचे वेळापत्रक, स्वरुप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम, परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत इत्यादी व अन्य बाबीविषयीची सूचना परीक्षेच्या अधिसूचनेत परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.