देवगड जामसांडे नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय कोकण आयुक्तांकडून कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते अपात्र

देवगड जामसांडे नगरपंचायत चे तत्कालीन नगरसेवक रोहन खेडेकर यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात कोकण आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेबाबतचा आदेश कायम ठेवत ठेवल्याने रोहन खेडेकर यांचे अपात्रता कायम झाली आहे. या बाबत भाजपचे योगेश चांदोस्कर यांनी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार श्री. खेडेकर यांना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अपात्र ठरवले होते. या अपात्रतेनंतर श्री. खेडेकर यांनी कोकण आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. हे अपील अमान्य केल्याने हा खेडेकर यांना एक मोठा धक्का मानला जात आहे.

देवगड/ प्रतिनिधी

error: Content is protected !!