भाजपचे आमदार नितेश राणे यांनी “होऊ दे चर्चा” मध्ये चर्चेला यावं!

आमदार वैभव नाईक यांचे नितेश राणेंना आव्हान

कणकवलीतील “होऊ दे चर्चा” कार्यक्रमापूर्वीच वातावरण तापलं

कणकवली गेल्या 9 वर्षात भाजपने दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत.त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न” या अभियानाची सुरुवात गेले दोन दिवस करण्यात आली आहे. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांच्या मनातील प्रश्नांना व्यासपीठ मिळत आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला जी जी खोटी आश्वासने दिली त्याचे काय झाले?. सत्ता आल्यानंतर दीड वर्ष झालं. असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना केला आहे. मी काम काय केलं हे माझ्या मतदारसंघातील जनतेला माहिती आहे. पण मी नारायण राणे किंवा नितेश राणेंसारखा ईडी ची चौकशी होईल या भीतीने स्वतःचा पक्ष गुंडाळून राणें सारखा भाजपमध्ये पळालो नाही. तसेच पन्नास खोके व मंत्रीपदाची आश्वासने देऊनही मी हललो नाही. मी सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. व सर्वसामान्य जनतेचा आमदार म्हणून मला लोक ओळखता. त्यामुळे जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा काम मी करतो. व यापुढेही करत राहणार. भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकांनी कसे पळवून लावलं ते नितेश राणेंनी व्हिडिओमध्ये पहावं. व जर आमदार नितेश राणे देखील आले तर त्यांच्याशी देखील आम्ही होऊ दे चर्चा मध्ये चर्चा करण्यास तयार आहोत. केंद्र व राज्यातील सरकारच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यास नितेश राणे तयार असतील तर होऊ द्या चर्चा. आम्हीही तयार आहोत असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!