पर्यटन दृष्ट्या आशिये गाव विकसित करूया!

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन

आशिये नवीन ग्रामपंचायत व त्रिदल महोत्सवाचा शुभारंभ

आशिये गावात त्रिदल महोत्सव सुंदर आयोजन केलं आहे.लहान जरी गाव असलं तरी आजचे कार्यक्रम खरोखरच आर्थिक समृध्दी देणारे आहेत.विकासाचा पाया केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पर्यटन जिल्हा घोषित करत रचला आहे.लोकांच्या आयुष्यात सुधार कसा आणता येईल? यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्न करीत आहोत.होम स्टे किंवा वॉटर पार्क करु शकतो का? पर्यटन विकसित गावांना भेटी द्या,विकसित पर्यटन स्थळांना भेट सरपंच महेश गुरव आणि गावातील लोकांनी द्या. हातभार नव्हे तरी हा नितेश राणे शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील.आशिये गावात पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडेल,असा विश्वास भाजपा आ.नितेश राणे यांनी व्यक्त केला.
आशिये ग्रामपंचायत नूतन वास्तूचा लोकार्पण, आशिये पर्यटन संकेतस्थळाचे उद्घाटन झेंडा फडकवत भाजपा आ.नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले . यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,खरेदी विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष सोनू सावंत,महेश लाड,सरपंच महेश गुरव,उपसरपंच संदीप जाधव,मालवणी कवी विकास खानोलकर, ग्रामसेवक राकेश गोवळकर,माजी सरपंच शंकर गुरव,बाळा बाणे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.नितेश राणे म्हणाले,आमच्या कुटुंबावर आशिये गावातील लोकांनी फार विश्वास टाकला आहे.त्यामुळे आमच्या कुटुंबाचे विशेष प्रेम या गावावर आहे.कुठल्याही कामासाठी निधी नाही हा शब्द आमच्याकडे नाही.आपल्या हक्काची माणसे या गावात राहणारी आहेत.मी ९ वर्षे आमदार म्हणून निधी कमी पडू दिला नाही.आता ही पर्यटनाची चळवळ उभी करीत आहात.सामाजिक,धार्मिक इतिहास उभा जगासमोर ठेवला जाणार आहे.गावात पर्यटनाच्या दृष्टीने लोकांनी येण्यासाठी कारणे तयार करायला लागतील.पर्यटनाच्या माध्यमातून विकास गतीने होईल.गोव्या सारखे छोटे राज्य असूनही त्या राज्याचे अडीज लाख रुपये दरडोई उत्पन्न आहे.
आशिये ग्रामपंचायत आणि गावातील लोकांनी सहभाग घेत असे पर्यटन गाव विकसित करा, कणकवली पटवर्धन चौक येथे पर्यटक आला की पहिल्यांदा वाहतूक पोलिसाला आशिये गावाकडे जाणारा रस्ता कुठे? असे विचारले पाहिजे,असे काम गावात पर्यटनाच्या दृष्टीने उभे करा,असा आवाहन आ.नितेश राणे यांनी केले.
मी काही प्रयोग तरी करतो. काहीतरी वेगळी कल्पना केली पाहिजे.ती लोकांसमोर मांडली पाहिजेत. त्यात वॉटर स्पोर्ट बंद केलं,कारण या नदीपात्रात मोठे दगड आहेत,अपघात होण्याची शक्यता होती.पण पोदार इंटरनॅशनल स्कूल आम्ही आणले. आता चांगले शिक्षण नव्या पिढीला मिळत आहे. त्यामुळे प्रेरणाच्या माध्यमातून काम करत असताना या पर्यटन समित्या गावांमध्ये कागदावर राहू नये ,त्यासाठी पर्यटन समिती लोकांसमवेत एक बैठक आयोजित करावी, अशी सूचना गटविकास अधिकारी व महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांना आमदार नितेश राणे यांनी केली.आता तुमचा आमदार सत्तेत आहेत.सत्तेत बसलेला आमदार किती स्पीडने काम असेल हे अधिकाऱ्यांना दिसत आहे. माझ्या मतदारसंघात सर्व अधिकारी मला विचारून काम केल्याशिवाय काम केलं जात नाही,असा इशारा अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.
मालवणी कवी विलास खानोलकर म्हणाले, आशिये गावात पहिल्यांदा नारायण राणे आले ते नदीतून चालत आले.त्यापासून आज पर्यंत राणे कुटुंबाशी गाव प्रामाणिक राहिला.आजही या गावचा विकास राणेंमुळे होत आहे.सरपंच महेश गुरव यांनी गावाला दिशा देण्याचे काम केलं आहे.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी आपल्या माध्यमातून चांगला निधी देण्याचे काम केले. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आमचा आशिये गाव जगाच्या नकाशावर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले, कणकवली तालुक्यात पर्यटन संकेतस्थळ चालू करणारी ही पहिली ग्रामपंचायत आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि गाव पातळीवरील काम करणारी ग्रामपंचायत विकासाचा केंद्र बिंदू आहे. ही इमारत लोकार्पण झाली आहे.आता तालुक्यात ९ ग्रामपंचायत इमारती राहिल्या आहेत,त्याही आमदार राणे यांच्या माध्यमातून पूर्ण होतील.
पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दूरदृष्टी ठेवत गेल्या २५ वर्षांपूर्वी पर्यटन जिल्हा घोषित केला. सागरी पर्यटनाबरोबरच आता ग्रामीण पर्यटन विकसित करण्याची गरज आहे .त्यामुळे आशिये गावात पर्यटन संकेतस्थळ आज सुरु झाले आहे.भविष्यात हे गाव पर्यटनाच्या नकाशावर पोहोचेल.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत म्हणाले,या गावचे सरपंच महेश गुरव यांच्या मुळे या गावात नवीन नवीन उपक्रम घेऊन येता आले.२५ वर्षांपूर्वी ना.नारायण राणे यांच्या माध्यमातून पर्यटन जिल्हा झाला आहे.आशिये गावातील प्रत्येक समाजातील लोक आ.नितेश राणे यांच्याकडे गेल्यानंतर पत्र दिले जाते.
मी जे काम केले ते देखील
राणेंमुळे आहे.राज्यात दबदबा असलेल्या आ.नितेश राणेंच्या पाठीशी गावाने राहिले पाहिजे.कारण राज्यात अभ्यासू आमदार आपला आहे,याचा सर्वांना अभिमान वाटेल असे काम नितेश राणे करीत आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश ठाकूर,सूत्रसंचालन मंगेश लाड तर आभार महेश गुरव यांनी मानले. दिवसभर त्रिदर महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!