कळसुलीच्या अनियमित एसटी सेवे बद्दल सरपंचांसह ग्रामस्थांची कार्यालयावर धडक

ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिके नंतर अखेर एसटी फेरी सोडली
एसटीच्या अनियमित सेवेमुळे कळसुली ग्रामस्थांनी सरपंच सचिन पारधीये यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या कार्यालयावर धडक दिली. यासोबत सकाळच्या 9.20 गाडीमध्ये मुलांना प्रवेश नाकारणे, याबाबत देखील यावेळी विचारण्यात आला. मुख्याध्यापक वगरे यांनी यामुळे मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची कैफियत मांडली .तसेच सरपंच पारधीये व स्वप्निल गोसावी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे असे घडल्यास सर्व कळसूली ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला. त्यामुळे अखेर चार वाजताची एसटी सायंकाळी पाच वाजता मार्गस्थ करण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी