हळवल फाट्यावर गॅस टँकर पलटी

चालक जखमी, सातत्याने या वळणावर होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना नाहीत

कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी पुलावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर आज गुरुवारी 11.30 वाजण्याच्या सुमारास गॅसचा टँकर पलटी झाला. यात चालकाला काही प्रमाणात दुखापत झाली. सातत्याने या वळणावर अपघात होत असून, हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरण कडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हे अपघात केव्हा बंद होणार? व यासाठी उपाययोजना होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!