जिल्हा नाट्य महोत्सव आज विद्यामंदिर माध्य. प्रशालेत उत्साहात साजरा

कणकवली/मयुर ठाकूर

या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ साळुंखे मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषविले विज्ञान आणि मानवी जीवन या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून नाट्य कलाकाराना शुभेच्छा व्यक्त केल्या . प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी मा . किशोर गवस साहेब उपशिक्षणाधिकारी श्रीमती आवटी मॅडम यांनीही नाट्य महोत्साला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी जे कांबळे सरांनी केले विज्ञान नाटक आणि बालरंगभूमी याविषयी मार्गदर्शन केले आणि विज्ञान नाट्यातून समाज प्रबोधनाची चळवळ कशी निर्माण होते याविषयी मत प्रदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या . संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नाट्य स्पर्धेसाठी आठ तालुक्यातून आठ संघ उपस्थित होते उत्कृष्ट नाटय सादरीकरण करून प्रत्येक संघाने आपला प्रभावी ठसा उमटविला . या नाट्य महोत्सवाचे संपूर्ण सूत्रसंचालन विज्ञान शिक्षिका सौ केळुसकर मॅडम आणि शेळके जेजे सर यांनी उत्कृष्ट रितीने सादर केले . या नाट्य महोत्साचे परिक्षक निलेश पवार ‘ चव्हाण सर ‘ यांनी केले .
बक्षिस वितरण समारंभाला प्राथमिक व योजना शिक्षण अधिकारी मा . प्रदिपकुमार कुडाळकर साहेब समारोप कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या अमोघ वक्तृत्वाने सर्व स्पर्धेक आणि शिक्षकांना प्रोत्साहित केले. व विजेत्या संघाचे कौतुक केले यावेळी आवटी मॅडम श्री मेंगाने साहेब उपस्थित होते . या दिवसभराच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नेटके नियोजन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्रीवणवे सर विज्ञान विभागातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले . आभार श्री वणवे सरांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .

error: Content is protected !!