काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाप्रमुख पदी डॉ. सुनिता म्हापणकर

डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी केली निवड जाहीर
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेस डॉक्टर सेलच्या सिंधुदुर्ग डॉक्टर कमिटी जिल्हाप्रमुख पदी डॉ. सुनिता म्हापणकर यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या शिफारशीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले असून, प्रदेश काँग्रेसचे डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉक्टर मनोज राखा यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे. या नियुक्ती बद्दल डॉ. सुनिता म्हापणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली