दुर्गवीर प्रतिष्ठान आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था,फोंडाघाट गडसंवर्धन यांनी छ. शिवाजी महाराजांना दिली अनोखी मानवंदना

खारेपाटण किल्ले हे स्वराज्याचे वारसदार आहेत,ते जपणे ही काळाची गरज आहे , आणि म्हणूनच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग (महाराष्ट्र राज्य) नियोजीत छ. शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत सोमवार दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हयाच्या सीमेवर वसलेल्या किल्ले खारेपाटण येथे दुर्गवीर प्रतिष्ठान आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहिम यशस्वीरीत्या संपन्न झाली.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट येथील ६० विद्यार्थी, शिक्षकवृंद व दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेचे ६ सहकारी सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान किल्यावर असलेल्या दुर्गादेवी मंदिर परिसर, बुरुज, पायवाट आणि तटबंदी वरील गवत आणि झाडेझुडुपे काढून स्वच्छता करण्यात आली.अशी अनोखी मानवंदना शिवचरणी अर्पण करण्यात आली .
या स्वच्छता मोहिमेसाठी आयटीआय फोंडाघाट चे सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचं सहकार्य लाभले. मोहिमेचा समारोप करताना दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत रवींद्र रावराणे यांनी आपण किल्ले जपले तर आपण आपल्या पिढीला महाराजांचा इतिहासा बरोबरच इतिहासाचे साक्षीदार असणे किल्ले दाखवू शकतो.यावरून विद्यार्थ्यांना गडकिल्ले संवर्धन काळाची गरज आहे हे पटवून देऊन त्यांना पुढील उपक्रमावेळी सहभागी होण्यासाठी आवाहन केले. यावेळी स्थानिक अभ्यासक आणि खारेपाटण किल्ला संवर्धन टीम मधील ऋषिकेश जाधव यांनी किल्ल्याचा इतिहास व गडावर होणारे उपक्रम याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. आयटीआय फोंडाघाट चे मा. सोनावणे सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले .
यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानचे रविंद्र रावराणे, मधुकर विचारे,प्रथमेश वरवडेकर,निलम पांचाळ,माधवी पांचाळ,रोहित साईल हे दुर्गवीर उपस्थित होते..
अस्मिता गिडाळे, खारेपाटण