सिंधुदुर्ग उपपरिसर मुंबई विद्यापीठ समाजकार्य विभागात आंतरराष्ट्रीय स्वच्छता ही सेवा अंतर्गत श्रमदान व ज्येष्ठ नागरिक दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरे

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी (ता. १) सकाळी दहा वाजता एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग उपपरिसरातील समाजकार्य विभागाने विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक वर्ग यांनी परिसराची साफ सफाई करून आपला सहभाग नोंदवला.
तसेच समाजामध्ये असणाऱ्या सर्वच स्तरावरील वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगामध्ये १ ऑक्टोबर हा दिवस’जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग परिसर समाजकार्य विभागात हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाच्या निमित्ताने प्राध्यापक अमर निर्मळे यांनी एकूणच वृद्धांची सद्यस्थितीतील परिस्थिती कशी आहे यावर प्रकाश टाकला तर प्राध्यापिका माया रहाटे यांनी वृद्धांच्या समस्या नेमकेपणाने आपण कश्या सोडवल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले तर प्राध्यापिका पूनम गायकवाड यांनी वृद्धासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यानी त्या गरजू वृद्धांना मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे याविषयीचे गांभीर्य समजावून सांगितले.