मनसेच्या वतीने तिरोडा येथे सोलर लाईटचे लोकार्पण

सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील कोल्हारवाडी,सावंतवाडा येथे गणपती विसर्जनस्थळी सोलर लाईट लावण्यात आले.येथील स्थानिकांच्या मागणीनुसार मनसे लॅाटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून सोलर लाईट देण्यात आले.यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता.सदर सोलर लाईटचे श्री.नारायण सावंत व मनसे विद्यार्थी सेनेचे सावंतवाडी तालुका सचिव मनोज कांबळी यांच्या हस्ते नारळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी प्रशांत सावंत,चंद्रकांत सावंत,रामचंद्र कांबळी,संदेश शेट्ये,अमर सावंत,ध्रुवबाळ सावंत,मयूर पालकर,ओमकेश गोडकर,प्रणित तळणेकर,भैय्या कोल्हे,आदी उपस्थित होते.सदर सोलर लाईटची मागणी मनसेच्या वतीने पूर्ण करण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थांनी श्री.कदम व सुभेदार यांचे आभार मानले.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!