राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांची जयंती उत्साहात साजरी.

कणकवली/मयूर ठाकूर.
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत २ ऑक्टोंबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम प्रशालेत राबविले गेले . या कार्यक्रमांचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी जे कांबळे सरांनी भुषविले . प्रमुख उपस्थिती परिवेक्षक सौ जाधव मॅडम आणि श्री वणवेसर तसेच गांधी विचारांचे दर्शन घडविणारे वैचारिक भाषण जेष्ठ अध्यापक श्री संदिप कदम सर श्री . खरात सर सौ वारघडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये सौ केळुसकर मॅडम यांनी दिग्दर्शन केलेले गांधी विचारांचे चरित्र मुक नाट्य विद्यार्थानी उत्तम अभिनयाने सादर करून एक आदर्श घडवून आणला . श्री बर्डैसर ‘ मोर्ये सर यांनीही मूक नाट्य उपक्रमात मोलाची मदत केली . म गांधी व लालबहादूर शास्त्री . यांच्या जीवन चरित्रांचा आदर्श प्रशालेतील विद्यार्थांना निर्माण होऊन मूल्य संस्कारित पिढी तयार व्हावी हाच उद्देश या उपक्रमातून होत असतो . यावेळी सर्व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमांचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जे जे शेळके सर यांनी नियोजनबध्द केले होते विद्यार्थांनी सुत्रसंचालन करून आभार मानले व कार्यक्रमांची सांगता झाली .