कुडाळ मालवण तालुक्यात ४ ऑक्टोबर रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!” अभियान

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या आश्वासनांचा आणि बोलघेवड्या योजनांचा करणार भांडाफोड

        केंद्र व राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचा आणि बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड करण्यासाठी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी  "होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!" हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत.

 ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा.कुडाळ शिवसेना शाखेसमोर, दुपारी १२ वा.  माणगाव बाजार न्हयदेवी कॉम्प्लेक्स  येथे,  दुपारी ३ वा. पोईप  बाजारपेठ येथे, सायं ५ वा. मालवण शहर फोवकांडा पिंपळ येथे कॉर्नर सभा होणार आहेत.  यावेळी अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, शिवसेना उपनेत्या मिनाताई कांबळी, उपनेते गौरीशंकर खोत हे मार्गदर्शन करणार आहेत.

      याप्रसंगी आमदार वैभव नाईक,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,कुडाळ मालवण विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,नितीन वाळके, बाळा म्हाडगुत हे उपस्थित राहणार आहेत.

    तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी,शिवसैनिक आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना  उपजिल्हाप्रमुख  अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक  बबन बोभाटे, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे
error: Content is protected !!