विद्यूत मंडळाच्या नावाने फोन करुन फसविण्याचे प्रकार

आचरा– आचरा परीसरात गेले दोनतीन दिवस 919163814280 या नंबर वरून फोन करुन महावितरण कडून बोलत असल्याचा कांगावा करत विद्यूत वितरण ग्राहकांना वीज बिल भरले नसल्याने रात्री तुमचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात येईल यासाठी तातडीने वरील नंबरवर दहा रुपये गुगल पे करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे विज ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आहे.बोलणारा मराठी मधून बोलत आहे.त्यामुळे विद्यूत ग्राहक बसण्याची शक्यता आहे.
याबाबत आचरा विद्यूत मंडळाचे
सहाय्यक अभियंता अनिल मठकर यांनी अशा फोन कॉल्स ला प्रतिसाद नदेण्याचे आवाहन केले आहे. सदर कॉल्स फसवणूकीचे प्रकार असून महावितरणकडून असे कोणतेही फोन केले जात नाहीत.तरी अशा फोन्सना प्रतिसाद देवून पैसे पाठविल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. तरी याबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!