वनेस्वच्छ ठेवून जैवविविधतेचे संरक्षण करा–वनक्षेत्रपाल संदीप कुंभार

आचरा- अविघटनशील कचरा वनक्षेत्रात टाकल्याने वन्य प्राण्यांना त्याचा उपद्रव होऊ शकतो तसेच जैवविविधतेचा ही ऱ्हास होतो यासाठी जंगल स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केले.
वन्यजीव सप्ताह दिनानिमित्त उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखाली
धामापूर तलाव क्षेत्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली या वेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी त्यांच्या सोबत वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट,
धामापूर सरपंच -मानसी परब,उपसरपंच -रमेश निवतकर
समयक संस्था अध्यक्ष व ग्रामस्थ तसेच कुडाळ वनपरिक्षेत्रतील सर्व वन कर्मचारी आदी उपस्थितीत होते.यावेळी धामापूर वनशेत्रालगत असलेल्या तलावाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली त्यावेळी वनक्षेत्रपाल संदिप कुंभार,कुडाळ यांनी अविघटनशील कचरा वनक्षेत्रात टाकल्याने वन्य प्राण्यांना त्याचा उपद्रव होऊ शकतो तसेच जैवविविधतेचा ही ऱ्हास होतो वनक्षेत्रात कचरा टाकने हा कायद्याने गुन्हा आहे, यावेळी कासार टक्का परिसरात येणाऱ्या भाविकांनी वनक्षेत्रात कचरा न टाकण्याचे आव्हान वनविभागामार्फत करण्यात आले.
आचरा–अर्जुन बापर्डेकर