पळसंब ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती साजरी

ग्रामपंचायत पळसंब येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात पळसंब ग्रामपंचायत चे महेश वरक यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. या कार्यक्रमास उपसरपंच अविनाश परब,श्रीम.स्मिता जुवेकर,सत्यवान तेजम (ग्रा.पं.सदस्य)अमित कांबळी (ग्रामसेवक)श्री.मधुकर जोईल,श्री.अनिल परब,श्री.गुरू वाळवे,अंगणवाडी सेविका सौ.प्रिया चिंदरकर,श्रीम.सूचिता सावंत,श्रीम.निखिता पुजारे,श्री.योगेश तेजम आदी उपस्थित होते.
आचरा–अर्जुन बापर्डेकर