बॅ नाथ पै मित्रमंडळ कणकवली आयोजित “एक कदम स्वछता की ओर” अभियान.

भारत सरकारच्या “स्वच्छ भारत” अभियानात घेतला सहभाग.
दहा प्लास्टिक पाणीबॉटल जमा केल्यास एक कॅटबरी आणि एक पाणी बॉटल जमा केल्यास एक चॉकलेट.
लहान मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण होण्यासाठी मंडळाचा प्रयत्न.
कणकवली/मयूर ठाकूर.
बॅ नाथ पै नगर मित्र मंडळ आयोजित “स्वच्छ भारत” आणि “एक कदम स्वच्छता की ओर” या भारत सरकारच्या अभियानामध्ये सहभागी होत शहरामध्ये एक अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आहॆ.यां उपक्रमाला लहान मुले उत्स्फूर्त प्रतिसाद देताना पाहायला मिळतंय.कॅडबरी-चॉकलेट वाटप यनिमित्ताने होत आहॆ.”लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा” आणि त्याला आकार देऊन त्याची मूर्ती घडते म्हणूनच हा छोटासा प्रयत्न दिनांक दोन ओक्टोम्बर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आयोजित करण्यात आला.दहा प्लास्टिक पाणी बॉटलवर एक कॅटबरी आणि प्रत्येक बॉटलवर एक चॉकलेट फ्री असा हा लहान मुलांसाठीचा उपक्रम आहॆ. या उपक्रमामध्ये मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.