शारदा विद्यामंदिर कातवड आनंदव्हाळ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

दोन ऑक्टोबर रोजी शारदा विद्या मंदिर कातवड आनंदव्हाळ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे बालपण ,शिक्षण आणि स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे योगदान आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळला जातो हे सांगताना महात्मा गांधींनी विश्वाला अहिंसेची शिकवण ही देणगी दिल्याचे सांगितले.
लालबहादूर शास्त्री यांनी गरिबीत कसे शिक्षण घेतले आणि महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याने प्रेरित होऊन अतिशय कणखर पणाने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिल्याचे स्पष्ट केले. शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक श्री सुनील सावंत यांनी मार्गदर्शन केले. कुमार दत्तात्रय खरवते यांने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!