विद्यामंदिर कणकवली येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान संपन्न

कणकवली : प्रशालेच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ अंतर्गत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती. किरण रास्ते मॅडम लाभल्या होत्या. तसेच विचारमंचावर प्रशालेचे जेष्ठ शिक्षक सन्मा. श्री. वणवे सर, जेष्ठ शिक्षिका श्रीमती. जाधव मॅडम, महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.एस. एल. कदम सर, स्काऊड गाईड विभाग प्रमुख श्री. जे.जे. शेळके सर, हिंदी विषय शिक्षक आणि निवेदक श्री. सिंगनाथ सर, विज्ञान शिक्षक श्री. बर्डे सर, गणित शिक्षक श्री. नागभिडकर सर, चतुर्थश्रेणी वर्गातून श्री. ए. आर. इंगळे इत्यादी अधिकारी व कर्मचारी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

मयूर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!