सरकारी बाबूंमुळेच हत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय

अन्यायकारक जीआरची होळी करणार: गोपाळ गवस
दोडामार्ग सरकारी बाबूंमुळेच हत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. वनअधिकारी आणि मंत्र्यांचे न ऐकता ते अन्यायकारक जीआर (शासननिर्णय) काढत आहेत.त्यामुळे तिलारी खोऱ्यातील शेतकरी त्या जीआरची होळी करून सरकारी बाबूंचा निषेध करणार आहेत ,अशी माहिती मोर्लेतील शेतकरी व शिवसेनेचे पदाधिकारी गोपाळ गवस यांनी दिली.
वन व महसूल विभागाने २२ सप्टेंबरला काढलेल्या जीआर मध्ये पाच वर्षांवरील माडाला ९ हजार ५०० रुपये , केळीला २४० रुपये,पोफळीला ७ हजार व अन्य झाडांना १ हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्या जीआर मध्ये २०१२,१३ व १५ मध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठ कांचा आणि वनमंत्री, वित्तमंत्री,मुख्यमंत्री आदींशी झालेल्या चर्चेचा व वाढीव रक्कम मागणीचा उल्लेखच नाही .शेतकऱ्यांच्या वतीने मंत्री केसरकर यांनी माड पोफळीला ३५ हजार भरपाई देण्याची मागणी केली होती.ती मान्य न करता आयएएस अधिकाऱ्यांनी मागील बैठकांचा हवाला देऊन भरपाई निश्चित केली आहे ते चुकीचे आहे.त्यांनी एसी कार्यालयात न नसता गावांत येऊन नुकसानी पाहावी आणि मग भरपाई रक्कम निश्चित करावी असेही गोपाळ गवस यांनी म्हटले आहे .
प्रतिनिधी। दोडामार्ग