खारेपाटण येथे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी पलटी होऊन अपघात

खारेपाटण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण शुक नदीवरील मुख्य ब्रिजवर हॉटेल मधुबन जवळील अवघड वळणावर वाहन चालकाला डायव्हर्शन नीट लक्षात न आल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी वाहन क्र.एम एच ०४ के एफ १२५० ही गाड़ी पलटी होऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खारेपाटण ब्रिजवर घडली. संतोष सोनू जंगले वय ३० वर्षे राहणार मठ बुदुक हा आपल्या मालकीची महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी गाडी मुंबई, वडाळा येथून घेऊन शासकीय समान घेऊन जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे चालला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण येथे आला असता येथील मुख्य ब्रिजवर एकच लेन सुरू असल्याने दुसरी लेन प्राधिकरणाच्या वतीने बंद करून ठेवण्यात आल्यामुळे स्टेट ब्रिजवर डायव्हर्षण मोड ठेवल्यामुळे चालकाचा ताबा सुटून गाडी पलटी झाली व अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले नाही. मात्र वाहनाचे किरकोळ नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सो प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव ग्रा. पं. सदस्य गुरूप्रसाद शिंदे सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली खारेपाटण शहरातील संपूर्ण हायवे ल दोन्ही बाजूनी सर्व्हिस रस्ते होणे नागरी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी महत्वाचे असून हायवे प्राधिकरण व प्रशासनाने तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याकडे गभियनि लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
खारेपाटण। ब्युरो न्यूज