पडेल व उंबर्डे प्राथमिक केंद्रांच्या सुसज्ज रुग्णवाहिकांचे आ. नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

देवगड कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे केंद्रासाठी जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या रुग्णवाहिकाचे आज बुधवार दि २७ सप्टेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन २०२२-२३ च्या निधीतून वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे व देवगड तालुक्यातील पडेल या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या होत्या.
या दोन्ही रुग्णवाहिकांचे आज जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सामान्य प्रशासन चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली देवगड मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज लोकार्पण झाले. या दोन्ही रुग्णवाहिका आजपासून रुग्णसेवेसाठी आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत