आंजिवडे व कारिवडे ग्रामस्थांचा नगरपालिका प्रशासनाला घेराव

आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
आंजिवडे येथील “त्या” दोघा युवकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, संबंधितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेऊन आंजिवडे व कारिवडे ग्रामस्थांसह सावंतवाडी शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज येथील नगरपालिका प्रशासनाला घेराव घातला. यावेळी घटना घडलेल्या राजवाडा परिसरासह येथील आठवडा बाजारात असलेली धोकादायक झाडे तोडण्यात यावी, अशी मागणी यावेळी उपस्थितांकडून नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली.





