यंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे

भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यंदाचा राष्ट्रीय नौदल दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने भारतीय नौदलाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
आज त्या संदर्भात मंत्रालयात पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या, तसेच कार्यक्रमाच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेतला.
यंदाचा #नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्य दिव्य स्वरुपात झाला पाहिजे. यासाठी सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश उपस्थित अधिकार्यांना दिले.
त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणाऱ्या नौदल दिवसाचे औचित्य साधून नौदलाच्या वतीने मालवणजवळच्या राजकोट किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भात अधिकार्यांनी सादरीकरण केले.
या बैठकीला नौदलाचे वरिष्ठ अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.