डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेकरिता युरेका सायन्स सेंटर तर्फे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेची अंतिम लेखी परीक्षा 21 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. या परीक्षेचे एकूण चार टप्पे असतात. लेखी , प्रात्यक्षिक प्रकल्प व मुलाखत. यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत , कास्यपदक, शिष्यवृत्ती व सन्मानपत्र देऊन शास्त्रज्ञांच्या हस्ते गौरवण्यात येते व डॉ होमी भाभा रिसर्च सेंटर येथे दोन दिवस शिबिरात सहभाग घेता येतो. मुलांनी नुसते परीक्षार्थी न बनता त्यांची प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती आकलन शक्ती, चौकस बुद्धी वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हे या स्पर्धेचे उद्दिष्टे आहेत.
गेली पंधरा वर्षे सिंधुदुर्ग युरेका सायन्स सेंटर तर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत सिंधुदुर्गातील 77 विद्यार्थ्यांची डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे. यात १० सुवर्णपदक 59 रजत पदक व ९ कांस्यपदक विजेते आहे. विशेष म्हणजे गेली सतत तीन वर्षे सुवर्णपदकांचा सन्मान सिंधुदुर्गला मिळाला आहे

सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला कुडाळ परिसरातील इयत्ता सहावीच्या मराठी व इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांकरिता सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल या ठिकाणी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 तसेच मालवण, कणकवली, देवगड ओरस पणदूर परिसरातील विद्यार्थ्यांकरिता 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत कसाल विद्यानिकेतन स्कूल या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे याकरिता नाममात्र फि रु 100 /- आकरण्यात येणार आहे
तसेच या परीक्षेच्या पूर्वतयारी करिता युरेका सायन्स सेंटर तर्फे रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी लेखी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेसाठी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकरिता सावंतवाडी व कसाल केंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.
तरी या परीक्षेकरिता नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमार्फत किंवा वैयक्तिक युरेका सायन्स सेंटरच्या अध्यक्षा सुषमा केणी ९२८४०३५३२६ यांच्याशी 30 सप्टेंबर पर्यन्त संपर्क साधावा. किंवा वरील नंबर वर व्हाट्सअप वर नावासहित मेसेज पाठवावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कणकवली (प्रतिनिधी)

error: Content is protected !!