जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. साई रुपेश धुरी यांची नियुक्ती

जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. साई रुपेश धुरी यांची नियुक्ती

गेले अनेक महिने या रिक्त असलेल्या पदा बाबत आमदार नितेश राणे यांनी वेधले होते आरोग्यमंत्र्यांचे लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर डॉ. सई रुपेश धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. धुरी या जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी सिंधुदुर्ग या पदावर कार्यरत होत्या. विनंतीनुसार त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेले अनेक महिने सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद रिक्त होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर काही प्रमाणात ताण येत होता. ही बाब निदर्शनास येताच आमदार नितेश राणे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे या प्रश्नी लक्ष वेधले होते. व त्यानंतर ही तातडीने नियुक्ती करण्यात आली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!