राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले रिक्षा संघटनेच्या गणपतीचे दर्शन

संघटनेकडून अबीद नाईक यांचे स्वागत
कणकवली/प्रतिनिधी.
अजितदादा पवार गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आज कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणपतीची गुलाब पुष्पहार अर्पण करुण पूजा केली. त्यानंतर कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, सेक्रेटरी भाई परब, रिक्षा संघटनेचे संचालक संतोष सावंत, बाळू वालावलकर हे व कणकवली राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अमित केतकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी शहर चिटणीस गणेश चौगुले आदि उपस्थित होते.