चिंदर भगवंतगड,तेरई परिसरात बिबट्याचा वावर

पाळीव जनावरांवर हल्ला
चिंदर भगवंतगड तेरई भागात बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांनाहीदिवसाउजेडी बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच रानात चरायला सोडलेल्या शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केल्याची घटना चिंदर लब्देवाडी,तेरई भागात घडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून सदर बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सोमवारी दुपारी आचरा येथील उद्योजक जयप्रकाश परुळेकर आपल्या भगवंतगड मुळघरी गणेशोत्सवानिमित्त जात असताना त्यांच्या गाडीसमोरच बिबट्याने उडी मारल्याची घटना घडली आहे. ऐन चतुर्थी सणातच बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रौ आरती,भजनासाठी बाहेर पडणा-या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा