रवींद्र चव्हाण सारख्या काम करणाऱ्या मंत्र्यांना थोडा वेळ व पाठिंबा दिला पाहिजे

आमदार नितेश राणेंचा मनसेला सबुरीचा सल्ला

मनसेला कोणतीही मागणी करण्यासाठी टॅक्स लागत नसल्याचा लगावला टोला

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जी मेहनत घेतात यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मंत्री म्हणून त्यांनी सहा वेळा अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे. त्यामुळे काम करणाऱ्या मंत्र्यांबद्दल मनसेनेने चुकीची मागणी करू नये. डिसेंबर पर्यंत महामार्गाचे दोन्ही लेन पूर्ण करणार असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहेत त्यावर विश्वास ठेवला पाहिजे
कारण रवींद्र चव्हाण हे काम करणारे मंत्री आहेत. खरतर काँग्रेसच्या काळापासून हा महामार्ग होत होता मात्र तो पूर्णत्वास गेलेला नाही. भाजपच्या काळातच तो पूर्णत्वास जाईल असा विश्वास भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही गोष्टीची मागणी करायला कसला टॅक्स लागत नाही. मात्र काम कोण करतो हे प्रथम मनसेनेने पाहावे. काम करणाऱ्या माणसाकडून कामाची पेक्षा करावी. मनसेनेने उगाच घाईगडबड करून राजीनाम्या सारखी चुकीची वक्तव्य करू नये. चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला थोडा वेळ आणि पाठिंबा दिला पाहिजे. मनसेने तशा पद्धतीने मंत्री रवींद्र चव्हाण यांना पाठिंबा द्यावा. कारण नाशिक महापालिकेत एका दिवसात विकास झाला नाही त्यालाही पाच वर्षाचा कालावधी लागला.तरीही नाशिकच्या जनतेने काय रिझल्ट दिला तो आपल्याला माहीत आहे.त्यामुळे मनसेने थोडा संयम पाळावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. काँग्रसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हापासून या महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली.त्या दिवसापासून या महामार्गावरील जनतेचे अनेक प्रश्न सोडवत काम अंतिम टप्प्यात आले आहेत.येथे सामाईक सातबारा असतो.त्यातील दोन भाऊ मुंबई मध्ये असतात. त्यामुळे निवाड्याची कामे रखडतात.कामकरणाऱ्या ठेकेदारांचे प्रश्न, मोबदला मिळविण्यासाठी चे निवाडे असे अनेक प्रश्न आहेत.ज्यात एकट्या मंत्री रवींद्र चव्हाण यांची जबाबदारी राहत नाही तर संपूर्ण प्रक्रिया जलद होण्यास सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यात मंत्री चव्हाण हे करत आलेले काम पाहता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

error: Content is protected !!