सिंधुदुर्ग भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत श्री.बाबासाहेब वर्देकर यांची सदस्य पदी निवड.

कणकवली/मयूर ठाकूर.
भारतीय जनता पार्टी,सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली.सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्रक देत नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.हरकुळ गावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे हरकुळ गावातील पदाधिकारी असलेले श्री.भिवा उर्फ बाबासाहेब शंकर वर्देकर यांची जिल्हा कार्यकारणी मध्ये सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.तसे नियुक्तीपत्र त्यांना देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि त्यांचे अभिनंदन करण्यात आले.बाबासाहेब वर्देकर यांची आदर्श शिक्षक अशी ओळख आहे.तसेच गेली कित्येक वर्षे त्यांची कट्टर राणे समर्थक अशी देखील ओळख राहिली आहे.निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.वर्देकर सर हे नेहमीच सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा कार्यकारणी मध्ये सदस्य म्हणून निवड केले आहे.बाबासाहेब वर्देकर हे हरकुळ बुद्रुक गावचे सुपुत्र असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.