श्री शिवकृपा युवा मंडळ आचरा पारवाडी आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

सामाजिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या आचरा पारवाडी येथील, श्री शिवकृपा युवा मंडळ आचरा पारवाडीच्या वतीने गुरुवारी आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.याशिबिराची सुरुवात गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता विवेकानंद नेत्रालय कणकवली येथील डॉ. संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी तुषार हळवे , जयप्रकाश परुळेकर ,, अध्यक्ष . मिलिंद अशोक मुळये, उपाध्यक्ष सचिन परब, सचिव केदार शिर्के, खजिनदार .हरेश शेटये तसेच सांस्कृतिक समिती चे प्रमुख मुकेश मधुकर सावंत , नितिन घाडी यांच्यासह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या शिबिरास पंचक्रोशीतील सुमारे ९० लोकांनी लाभ घेत नेत्र निदान करुन घेण्यात आले.
आचरा– अर्जुन बापर्डेकर