आचरा हिर्लेवाडी येथील तिसरी,आणि चौथीपिढीही रंगली आहे गणेश मुर्ती बनविण्यातशंभर वर्षापासूनची परंपरा आजची पिढीही पुढे चालवत आहे

आचरा हिर्लेवाडी वाडी येथील काशिनाथ आचरेकर यांनी मुहूर्त मेढ रोवलेल्या गणेश मुर्ती शाळेचा कलेचा वारसा आचरेकर यांची तिसरी पिढी श्रीकांत आणि चौथी पिढी संकेत त्याच जोमाने त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.
शंभर वर्षापूर्वी रस्ते,वाहने नसल्याने दुरवरून गणेश मुर्ती आणताना वाडीतील लोकांची होणारी दमछाक बघून
काशिनाथ आचरेकर यांनी लोकांच्या आग्रहाखातर गणेश मुर्ती शाळा सुरु केली होती. सुरुवातीलाच दहाच्या आसपास या शाळेतून गणेश मुर्ती बनवल्या जायच्या. श्रीकांत आचरेकर यांच्या आजोबा काशिनाथ आचरेकर यांच्या नंतर वडील दिनानाथ आचरेकर यांनी ही हि परंपरा जोपासली होती. त्यानंतर काशिनाथ यांचा नातू श्रीकांत याने आपली सरकारी नोकरी असतानाही वेळात वेळ काढून आजोबांनी लावलेले हे गणपती मुर्ती शाळेचे रोपटे शाळेचे पावित्र्य राखत आजही जमाने वाढवत आहेत.त्यात त्यांना मुलगा संकेत आपला अभियांत्रिकी अभ्यास सांभाळून कलेजी जोपासना करण्यात मदत करत आहे.
सध्या त्यांच्या कडे पन्नास ते साठ गणपती मुर्ती बनविल्या जात आहेत.
याबाबत माहिती देताना श्रीकांत आचरेकर सांगतात गणेश मुर्ती शाळा ही व्यवसाय म्हणून न करता शंभर वर्षापुर्वी आजोबांनी ज्या पवित्र भावनेतून सुरु केली. त्याची जोपासणा करण्यासाठी म्हणून नोकरी सांभाळून सुरु ठेवली आहे. यात पारंपरिक रंगकाम, शाडू मुर्ती बनविण्यावर भर दिला जात आहे. लोकांच्या आग्रहाखातर प्लॅस्टर आफ परीस च्या मुर्ती काहीप्रमाणातच दिल्या जात आहेत. आचरेकर हे आजोबांच्या स्मृतींची जपणूक म्हणून ही गणेश मुर्ती शाळा आजही उत्साहाने चालवत आहेत.
आचरा– अर्जुन बापर्डेकर