मुंबई ते चिपी उड्डाण रद्द केल्याने प्रवासी संतापले

बोर्डिंग झाल्यानंतर उड्डाण रद्द ची घोषणा
अखेर साडेचार तासानंतर विमानाने केले उड्डाण
निलेश जोशी । सिंधुदुर्ग : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून विमानाने गावी येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना आज विमान कंपनीच्या असहकार्यामुळे नाहक त्रासाचा सामना करावा लागला. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी चिपीसाठी सुटणार विमान दीड वाजला तरी सुटलं नव्हतं. प्रवाशांनी बोर्डिंग केलं होत. त्याचवेळी हे उड्डाण रद्द केल्याची बातमी आल्यानं प्रवासी अजून संतप्त झाले. याबाबाबतच कारण जाणून घेतलं असता, पायलट आणि क्रू ची ड्युटी संपल्याने त्यानी विमान उडवायलाच नकार दिला. त्यातच विमानतला एसी सुद्धा काही काळासाठी बंद करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांच्या संतापात आणि त्रासात अजूनच भर पडली. पण प्रवासी सुमारे साडेचार तास विमानात बसून होते. शेवटी विमान उड्डाण करण्याचा निर्णय झाला आणि ४ वाजण्याच्या सुमाराला ५२ प्रवाशांना घेऊन विमानाने चिपीच्या दिशेने उड्डाण केलं.
काही दिवसांपूवीच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपी मार्गावर सेवा देणाऱ्या विमान कंपनीची लक्तर वेशीवर टांगली होती. त्याचा प्रत्यय आज चाकरमान्यांना आला.
निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.





