सुगम संगीत परीक्षेत श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगांवचा निकाल १०० टक्के

प्रतिनिधी । कुडाळ : श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगांवमार्फत घेण्यात आलेल्या सुगम संगीत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. त्याचा  परिक्षा प्रमाणपत्र वितरण समारंभ कुडाळ येथील केंद्रावर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
  मार्च २०२३ मध्ये झालेल्या १० वी च्या परीक्षेसाठी कला विषयाचे वाढीव गुण सदर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. कला व सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून संगीत परीक्षेसाठी दहावीच्या विद्याथ्यांना वाढीव गुणदानासाठी निवडलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे एकमेव विद्यालय आहे. सदर विद्यालयात प्रथमा ते अलंकार पर्यंतच्या गायन, हार्मोनियम व तबला वादन इ. च्या परीक्षा जून-जुलै व डिसेंबर-जानेवारी अशा दोन सत्रांत घेतल्या जातात..डिसेंबर २०२२ मध्ये २६ विद्यार्थी केंद्रातून परिक्षेसाठी बसले होते. तसेच जून २०२३ मध्ये १९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. सदर सत्राचे परिक्षक म्हणून हरीदास देसाई व रामकृष्ण गव्हाणकर, कोल्हापूर (गारगोटी) यांनी काम पाहिले. त्यांनी परिक्षेबरोबरच गायनामध्ये अलंकाराचे महत्व तसेच स्पर्धेसाठी गायनाची तयारी कशी करावी तसेच रियाज कसा करावा याबद्दलचेही सविस्तर मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर केंद्रप्रमुख  उदय शिरोडकर यांच्या हस्ते विद्याथ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेच्या बारा वर्षांच्या कला क्षेत्रातील कार्याची प्रशंसा केली. त्याच प्रमाणे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील सांगितीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या मध्ये गायन प्रथमा- राजस माळगावकर, द्वितीया दिया सामंत, तृतिया सिध्दी डेगवेकर, मध्यमा सुखी सामंत, उपांत्य हेमंत तेली, विशारद मनाली चव्हाण, अलंकार-शिवम् धर्णे त्याच बरोबर हार्मोनियम वादन प्रथमा प्रिया काणेकर, द्वितीया दिया सामंत,मध्यमा मनोहर आजगांवकर, विशारद आर्यन चव्हाण आणि तबला वादन तृतिया सुखी सामंत, मध्यमा आप्पा राऊळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.विद्यालयातर्फे शिक्षक म्हणून गायन व हार्मोनियम वादनासाठी श्री. राजाराम गव्हाणकर व तबला वादनासाठी श्री. प्रमोद मुंडये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाने सुगम संगीताचा वरील विषयांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. संस्थेतर्फे अध्यक्ष श्री. राजाराम गव्हाणकर, उपाध्यक्ष श्री भास्कर गुंजाळ, व सचिव श्री. विजय भिसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!