साकेडी शाळेत नाना – नानी मेळावा उत्साहात

आजी, आजोबांनी केली गाणी सादर

फनी गेम्स, संगीत खुर्ची अन बरेच काही, धम्माल मस्ती

शाळा साकेडी नं. 1 येथे नाना नानी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरळीत पणे पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने मुलांचे आजी, आजोबा उपस्थित होते. मुलांचे आणि आजी आजोबा यांचे नाते दृढ व्हावे, कौटुंबिक आत्मीयता वाढावी, योग्य संस्कार व्हावेत यासाठी शासनाने हा उपक्रम राबवावा म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा करावा, असे सूचित केले आहे. यावेळी
गावातील मुलांचे आजी, आजोबा बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका, सौ. समिधा वारंग यानी केले. आजीबाई चा बटवा याविषयी माहिती शिक्षक दिक्षा सावंत दिली. उपस्थित आजी, आजोबा नी स्वतः ची ओळख करून दिली. जुन्या आठवणीना उजाळा दिला. व कविता सादर केल्या. शैक्षणिक बदल सांगितला. काही फनीगेम्स घेतले. सौ. वारंग यानी, आले आजोबा ओटीत,काठी टेकीत टेकीत, हे कृति युक्त गाणे घेतले. नंतर श्री. मोरे यानी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पावसकर यानी ओघवत्या शैलीत केले. आजच्या प्रसंगी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास करावा. मोबाइल चा वापर जपून करावा. आणि आजी, आजोबा आपले दैवत आहे त्याना नेहमी वंदन करा. असे श्री. कदम म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी यानी सहकार्य केले. या कार्यक्रमाला शा. व्य.समिती सदस्य सौ. तन्वी ढवण, सौ. रसिका परब, तसेच पालकही उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!